पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचा 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय तोगरी, चा फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला आहे. या विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा चालू ठेवली आहे. १0 बोर्ड परीक्षेसाठी १02 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, सर्वच्या सर्वच म्हणजे 102 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 100%निकाल लागला आहे .
विशेष प्राविण्यासह 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर द्वितीय श्रेणीत 13 व 02विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी मध्ये आहेत , केंद्रातुन 94.80% गुण घेऊन कु.श्रध्दा धनराज येरनाळे प्रथम तर 93.40%गुण घेऊन कु अंकिता रामेश्वर पाटील आणि 92.40% गुण घेऊन कु अस्मिता दिलीपराव तेलंग व कु भाग्यवंती ज्ञानेश्वर हिंडे तृतीय आले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. शांतामा पंडितराव पाटील ,सचिव इंदुमती मनोहरराव येरनाळे, कार्याध्यक्ष महेश मनोहरराव येरनाळे, प्राचार्या वंदना महेश येरनाळे,उपप्राचार्य गुणवंत आणाराव काळगापुरे ,पर्यवेक्षक लक्ष्मण दौलतराव लोभाजी, केंद्र संचालक नागय्या रेवणशिद्या गुरूस्थळे व शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.