धनेगांव ता देवणी येथील विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन करु – भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : धनेगांव ता देवणी येथे वंलाडी येथील उपकेद्रावरुन विद्युत पुरवठा केला जातो, वारवांर विज पूरवठा वारवांर खंडित केला जात आहे,थोड्या प्रमाणात वार वादळ ,पाऊस आला की , विज खंडित होत आहे,रोजच्या या विजेच्या लंपडावामूळे नागरिक व ग्रामस्थ ञस्त आहेत,ऊन्हाळ्याचे दिवस आहेत गावात विद्युत पुरवठा खंडित असल्यामूळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहे त्यामूळे पाणी असूनही विजे अभावी ग्रामस्थांची खुप गैरसोय होत आहे, व तसेच धनेगांव ट्रान्सफार्मर हे गेली दहा दिवसापासून नादुरुस्त आहे ते तात्काळ चालु करावे, व सदरील ट्रान्सफार्मर हे 3:15 M.V.A असुन त्याऐवजी 5. M.V.A चा ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा व तसेच गावठाण हद्दीमध्ये नविन दोन 63 K.V.M चे रोहिञ व गावअंर्तगत साठी वाढीव वस्ती येथे नविन पोल व लाईनमॅन हे वारवार गैरहजर राहतात त्यांना सुचना करुन ते तात्काळ पदस्थापना असलेल्या गावी रोज उपस्थित राहवे,
व धनेगांव व हेंळब येथे एबीसी स्विच बसवुन धनेगांव व हेंळब ही गावें वेगवेगळी करावे व पाऊसाळा जवळ आल्यामूळे धनेगांव गावठाण हद्दीतील सर्व विद्युत पुरवठा करणार्या पोल व वाॅयरचे मेन्टनस करुन ट्री कटिंग करुन रोज गुल होणार्या लाईटपासुन व नागरिकाची गैरसोय होणारी तात्काळ दुर करावी व येणार्या दोन दिवसात सदरील विज पुरवठा सुरळीत नाही झाला तर भाजयुमो पध्दतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हणले आहे यावेळी,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष तथा उप-संरपच रामलिंग शेरे ,चेअरमन श्री संगाप्पा चरपले, श्री जंयत पाटील बाळासाहेब बिरादार,श्री राजकूमार बिरादार ,संगमेश्वर शेटकार , श्री विठ्ठल बोयणे यादीच्या निवेदनावरती स्वाक्षरी करण्यात आली.