चाकुचा धाक दाखवुन चार लाखाची चोरी

चाकुचा धाक दाखवुन चार लाखाची चोरी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरात मागील वीस दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दांपत्याला चाकूचा धाक दाखवून चार लाख चार हजार आठशे रुपयांचा ऐवज लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून माहितीच्या आधारे अहमदपूर पोलिसांनी सदर चोरट्यांचा पाठलाग केला मात्र गाडी सोडून चोरट्यांनी पोबारा केला आहे चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपूर येथील नागोबा नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवसांब शिवप्रसाद खंकरे वय 59 हे पत्नी शीला खंकरे सह राहतात मंगळवारी पहाटे 3:OO वाजेच्या सुमारास यांच्या घराचे दार लाथाबुक्क्यांनी तोडून चार चोरट्यांनी आत प्रवेश केला व त्यांच्या पत्नी च्या गळ्यावर चाकू ठेऊन घरातील कपाटातील मंगळसूत्र 3 तोळ्याच्या बांगड्या 2. 75 तोळे कानातील फुले 6 ग्राम झुमके 5 ग्राम सरकाळे 3 ग्राम अंगठी 5 ग्राम कानातील रिंग 2 ग्राम मंगळसुत्र 5 ग्राम चांदीचे कडे 4 तोळे असा एकूण अंदाजे साडेचार लक्ष रुपयांचा ऐवज लुटून नेला व कोणा सांगाल तर जीवे मारण्याची धमकी दिली खंकरे यांचे घर लोकवस्ती पासून दूर असून पाळत ठेवून चोरट्यांनी ऐवज लुटला आहे मागील काही दिवसांपासून शहरातील चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे याबाबत रात्रीच 2 वा चाकूर येथे चोरी करून काही चोरटे अहमदपूर कडे आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी नाके बंदी केली अहमदपूर येथील आयटीआय जवळ चोरांचा पाठलाग केला मात्र अल्टो गाडीत आलेले चोर गाडी तेथेच सोडून पळून गेले सदर गाडीचा क्रमांक एम एच 44 134 असून ही अंबाजोगाई येथील।चोरीतील गाडी असल्याची माहिती मिळाली आहे याप्रकरणी पोलिसांनी वीस ते पंचवीस संशयितांना पकडले असून त्यांची चौकशी चालू आहे अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार करीत आहेत शहरातील चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे दोन गाड्यांची गस्त असूनही चोर पोलिसांना दाद देत नसल्याचे ही नागरिकांत चर्चा आहे

दोन पथकांनी केला पाटलाग

चाकूर येथील चोरी प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर नाकेबंदी करण्यात आली मात्र नाकेबंदीला न जुमानता अल्टो कार भरधाव वेगाने गेल्याने तिचा पाठलाग केला असता आयटीआय च्या पाठीमागे चेंबर फुटल्याने गाडी बंद पडली व त्यातील चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यातील चोरी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे याबाबत संशयितांची धरपकड करण्यात येत असून नागरिकांनीही सजग रहावे असे आव्हान पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी केले

ठसे तज्ञ व श्वानपथक पाचारण
चोरी झाली याठिकाणी व संशयित कारवरचे सर्व ठसे घेतले असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत चोरांचा सुगावा लागला नाही.

About The Author