शेळगाव येथील शिबिरामध्ये २६६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, यांच्या वतीने शाहू विद्यालय,शेळगाव येथे परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोगनिदान व औषधी उपचार तथा नि:शुल्क रक्तशर्करा (ब्लडशुगर) तपासणी शिबिराचा एकूण २६६ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन अहमदपुर-चाकुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे हस्ते भगवान धन्वंतरी च्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.अध्यक्षस्थानी सुभाष चापोले हे होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळचे सदस्य साहेबराव जाधव व तसेच बापूसाहेब कज्जेवाड,गंगाधरराव अक्कानवरू,उत्तमराव पाटील,लक्ष्मण घुमे,मेघराज पाटील,माधव पाटील, घटकार,परमेश्वर केंद्रे,संपत मल्लीशे, गणेश पाटील,सचिन बदनाळे,प्रमोद चवळे, सतीश वाडकर,विश्वनाथ चवळे,संतोष जगताप,मनोहर लामदाडे,योगेश वाडकर,गणपत पाटील,पिंटू चवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांची व शिबिरासंबंधी माहिती दिली.
उद्घाटनपर भाषणात आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, वेळेत योग्य निदान व आवश्यकतेनुसार उपचार घेतल्याने रोग लवकर बरा होऊ शकतो.आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्यामुळे रोग गंभीर अवस्थेकडे जातो, व शरीराच्या अन्य अवयवांना सुद्धा बाधा करू शकतो.त्यामुळे वेळोवेळी धन्वंतरी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन केले.
शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलताना बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, कोरोनाच्या महामारीनंतर अनेकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी झालेली दिसून येते.त्यामुळे नागरिकांनी संतुलित व नियमित आहार – विहाराकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिबीरामध्ये वातविकार-५८;मधुमेह-२२; मुळव्याध-१३; त्वचाविकार-२२;हार्नीया व हायड्रोसिल-७ ;नेत्ररोग-४९;ददंतरोग-१५; श्वसनविकार; पोटाचे विकार- २४, लहान बालकांचे आजार-२८; स्त्रियांचे विकार(मासीकपाळी समस्या,ई)-३८ याप्रमाणे विविध आजारांच्या एकूण २६६ रुग्णांची तपासणी व रोगनिदान करुन आवश्यकतेनुसार औषधी उपचार करण्यात आले .
शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून एकूण ३९ व्यक्तींचे मोतीबिंदू आजाराचे निदान झाले व या नोंदणी केलेल्या व्यक्तींवर त्यांच्या सोयीनुसार लवकरच पुढील औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.प्रशांत बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मंगेश मुंढे यांनी केले.
शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.गुरुराज वरनाळे,डॉ.शिवकुमार मरतुळे,डॉ.रश्मी सुखदेवे,डॉ.प्रीती रोडगे तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी व कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.