सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल येथे दि. 31/05/2024 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंतीनिमित्त संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या.भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले असे मत श्री हाके यांनी व्यक्त केले. यावेळी संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रात्साविक गणेश कोइलवाड यांनी केले. सहशिक्षक गणेश पांचाळ यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.हरिदास यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच शाळेतील शिक्षक हीना कल्लुरकर, आसमा शेख, अमोल सूर्यवंशी, स्नेहा ओजा, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.