आठवडी बाजारात हरवलेला मोबाईल पोलीसांनी परत मिळवुन दिला; आयपीएस नवदीप अगरवाल यांची कामगीरी

0
आठवडी बाजारात हरवलेला मोबाईल पोलीसांनी परत मिळवुन दिला; आयपीएस नवदीप अगरवाल यांची कामगीरी

आठवडी बाजारात हरवलेला मोबाईल पोलीसांनी परत मिळवुन दिला; आयपीएस नवदीप अगरवाल यांची कामगीरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे काही दिवसापुर्वी सोमवारच्या आठवडी बाजारात एका पत्रकाराचा बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना मोबाईल हरवला होता तो मोबाईल बीडच्या एका इसमाकडून हस्तगत करून अहमदपूर पोलिसांनी परत मिळवुन दिला आहे

याविषयीची सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर येथील पत्रकार बालाजी काळे हे सोमवारच्या आठवडी बाजारात काही दिवसापुर्वी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते बाजार करून ते घरी आल्यानंतर आपल्या खिशामध्ये व्हीओ कंपनीचा २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईल हरवल्याची तक्रार अहमदपूर पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर लगेच प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पोलीस उप- अधिक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक नवदीप अगरवाल यांनी स्वतः लक्ष घालून मोबाईल चा तपास लावण्याची चक्रे गतीमान केली. यामध्ये पो. हे. कॉ. हणमंत आरदवाड, पोलीस अमंलदार विशाल मुंडे ,पो. हे. कॉ. कैलास चौधरी,

आदींचे एक पथक कामाला लागले. यामध्ये लोकेशनच्या आधारे हरवलेला मोबाईल बीड शहरात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असता पोलीसांचे एक पथक बीड येथे जाऊन तेथील पोलिसांशी संपर्क करून एका इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्याच्या अगोदर तो इसम एक तासभर हुलकावणी देत होता. अखेर त्या इसमाला पकडण्यात अहमदपूर पोलिसांना यश आल्यानंतर तो इसम उडवाउडवी चे उत्तरे देत होता. तिथे त्या इसमाच्या आई वडील यांना बोलावून चौकशी केल्यानंतर त्या इसमाने सांगीतले की हा मोबाईल मला बिडमध्ये एका ठिकाणी सापडला होता व त्याने तो मोबाईल अहमदपूर पोलीसांना सुपुर्द केला अहमदपूर पोलिसांनी तो मोबाईल आयपीएस अधिकारी नवदीप अगरवाल यांच्या हस्ते काळे यांना परत देण्यात आला. यावेळी पो. हे. कॉ. हणमंत आरदवाड, पोलीस अमंलदार विशाल मुंडे, पो. हे. कॉ. कैलास चौधरी,पोलिस फ्लॅश न्यूज चे उप संपादक गोविंद काळे, पत्रकार विरेंद्र पवार आदी उपस्थित होते.

आयपीएस अधिकारी नवदीप अगरवाल हे अहमदपूर ला आल्यापासून चोरट्यांचे, अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले असून अहमदपूर येथून पोलिस अधिकारी अगरवाल हे कधी जातील हे वाट पाहत आहेत तर दुसरीकडे अहमदपूर येथील नागरिक अगरवाल साहेबांचे कौतूक करत असून अभिनंदन करत आहेत.

मोबाईल हरवल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्यानंतर https://www.ceir.gov.in/home/index.jsp या वेबसाइट वर मिसिंगचा एफआयआर अपलोड करून तक्रार नोंदवावी. यानंतर तक्रारदाराला मेसेज येईल, मेसेज आल्यानंतर पोलिसांना संपर्क साधावा असे आव्हान आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *