काँग्रेसच्या वतीने उदगीर शहरात आनंदोत्सव

काँग्रेसच्या वतीने उदगीर शहरात आनंदोत्सव
उदगीर (एल.पी. उगिले) : लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत, ढोल ताशाच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला.
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय दलित अधिकार मंच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. यावेळी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे , काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, विधीज्ञ पद्माकर उगिले , अमोल कांडगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव मुळे, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.