वन्य पक्षी हुमा घुबडास सर्पमित्रांनी दिले जीवनदान

0
वन्य पक्षी हुमा घुबडास सर्पमित्रांनी दिले जीवनदान

लातूर (प्रतिनिधी ) : शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी शंकर शिंदे यांना ऍडिशनल एम.आय.डी.सी.कीर्ती ऑईल मिल च्या मागे घुबड अडचणीत असल्याचे दिसून आले असता त्यांनी, सर्पमित्र मुखिम शेख यांना संपर्क साधला. तेंव्हा सर्पमित्र सोहेल शेख व सर्पमित्र मुखिम शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली,तेंव्हा त्यांना ते घुबड जखमी असल्याचे दिसूनआले.

वन्य पक्षी हुमा घुबडास सर्पमित्रांनी दिले जीवनदान

ते घुबड जातीने हुमा घुबड (Indian Eagle Owl, Great Horned Owl, Rock Eagle Owl) असल्याचे लक्षात आले.घुबडाला अडचणीतून काळजीपूर्वक काढून त्यास ताब्यात घेतले, आणि घुबडाचे योग्य ते उपचार करून दोन दिवस निरक्षणाखाली ठेवून ते घुबड झेप घेण्यायोग्य आहे का याची खात्री करून वनरक्षक भालेराव यांच्या निदर्शनाखाली सर्पमित्र मुखिम शेख व सर्पमित्र बबलू चव्हाण यांनी हुमा घुबड या पक्ष्यास सुखरुप निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.

सर्पमित्रांनी दाखवलेल्या तत्परते मुळे या वन्य जीवाला जीवनदान मिळाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *