इनरव्हील क्लब अहमदपूर ठरले बारा बक्षिसांचे मानकरी
डॉ. मीनाक्षी करकनाळे यांना बेस्ट प्रेसिडेंट तर आशा तत्तापूरे यांना बेस्ट ट्रेझरर पुरस्कार
अहमदपूर (गोविंद काळे ) : या वर्षात कोरोनाच्या परिस्थितीत ही उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अहमदपुर इनरव्हील क्लबला तब्बल बारा पारितोषिक मिळाले आहेत. 37 वी डिस्ट्रिक असेम्ब्ली संजोग यामध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमन अनुराधा चांडक यांनी याची घोषणा केली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा सरोज कटियार, खासदार अनुप्रिया पटेल, संतोष सिंग सह 75 क्लब मधील पाचशेहून अधिक सदस्य यांची ऑनलाईन उपस्थिती होती. वर्षभरात इनरव्हील क्लबच्या वतीने चाकूर, उदगीर,लोहा,औसा येथे नवीन चार क्लब तयार केले आहेत. तसेच वृक्षारोपण कोरोना रुग्णांना अन्न वाटप ,कोरोना योध्यांचा सत्कार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, स्वेटर वाटप, लघुउद्योगा साठी महिलांना विविध प्रशिक्षण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, महिलांना पिठाची गिरणी वाटप, इत्यादी समाज उपयोगी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तब्बल 12 बक्षीस व प्रमाणपत्र मिळाले आहेत. यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मीनाक्षी करकनाळे, तर बेस्ट ट्रेझरर म्हणून आशा रोडगे-तत्तापुरे यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.तसेच ऑल राऊंडर क्लब,युथ डेव्हलपमेंट,वुमन एम्पॉवरमेंट,बेस्ट मेडिकल प्रोजेक्ट सह विविध 12 बक्षीस मिळाले आहेत.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी करकनाळे, सचिव डॉ.भाग्यश्री येलमटे,उपाध्यक्ष डॉ.वर्षा भोसले, कोषाध्यक्षा आशा तत्तापूरे-रोडगे,आय.एस.ओ. विजया भुसारे, एडिटर ॲड. ज्योती काळे, सहसचिव अनिता ओस्तवाल, सी.सी.सी.अनिता जाजू सह सर्व माजी अध्यक्षा व सदस्यांनी उत्तम कार्य केले आहे. इनरव्हील क्लब ला 12 पारितोषक मिळाल्याबद्दल माजी सभापती आयोध्याकाकी केंद्रे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, वैशाली चामे, प्राचार्या रेखाताई तरडे-हाके, कलावती भातांब्रे, मंजुषा फुलारी सुनिता गुणाले, सविता भुतडा, डॉ.ललिता किनगावकर,सुवर्णा महाजन सह सर्व सदस्यांनी अभिनंदन व कौतुक केले.