गणेश हालसे मित्र मंडळाच्या वतीने नुतन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व नुतन शिवसेना जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार

गणेश हालसे मित्र मंडळाच्या वतीने नुतन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व नुतन शिवसेना जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत चुडामणी महाराज मंदिर येथे गणेश हालसे मित्र मंडळाच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे नुतन प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील व शिवसेनेचे नुतन जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर येथील गणेश हालसे मित्रमंडळाने भाजपा नुतन प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील व शिवसेना नुतन लातुर जिल्हा अध्यक्ष बालाजी रेड्डी या दोन्ही अहमदपूरच्या दिग्गज नेत्यांना एकत्रित आणून त्यांच्या नुतन निवडी बद्दल मित्र मंडळाच्या वतीने संत चूडामणी महाराज मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी पदमाकर होनराव,सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, गोविंद गिरी, अमित रेड्डी, शिवसेना नगरसेवक संदीप चौधरी, शहर प्रमुख भारत सांगविकर, रोडगे सर,किशोर कोरे, श्रीकांत भूतड़ा, जय भूतड़ा, अंजया गोंड, दयानंद घाटोळ,लक्ष्मण अलगुले, गोविंद हिवरे, कुमार चव्हाण, किरण कदम,हरीश नाइकवाडे,प्रमोद शिंदे, सौरभ फुलारी, दीपक हालसे,दत्ता पाचंगे, राम जाधव, हेमंत शिंदे, प्रकाश केंद्रे , नारायण जायभाये , गोविंद चौधरी , गंगने , बापूराव शिरूरकर , अशोक हालसे , संतोष सोलपुरे, सुदर्शन हालसे, पुरूषोत्तम हालसे, संदीप पांचाळ, जाधव,निलेश बाहेती, प्रफुल कल्याणी, प्रज्वल बुलबुले, आकाश कंधारकर, सुशील फुलारी, संजय नलवाड़, बालाजी पोतदार, शुभम पोतदार, सर्व व्यपारी वर्ग, शिक्षक वर्ग, आदींची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!