रामदास पाटील यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधव हिचे पालकत्व स्वीकारले

रामदास पाटील यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधव हिचे पालकत्व स्वीकारले

उदगीर (एल. पी. उगिले ) : लिंगायत धर्म भूषण रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू भाग्यश्री जाधव हीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, तिला येणार्‍या प्रत्येक संकटात साथ देण्याचे आश्वासन देऊन तिचे पालकत्व स्वीकारले आहे. कर्णाचे दातृत्व लाभलेल्या प्रशासकीय सेवेत जिल्हा प्रशासकीय आधिकरी   म्हणून काम पाहणारे रामदास पाटील सुमठाणकर यांची सामाजिक सेवा खूप मोठी आहे. त्यांच्या या समाजाभिमुख स्वभावाचा विचार करून संभाजी ब्रिगेडचे मुखेड तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर यांनी भाग्यश्री जाधव हिच्या समोर येत असलेल्या अडचणीचा पाढा वाचल्यानंतर लिंगायत धर्मभूषण रामदास पाटील यांनी लगेच भाग्यश्री जाधव परिवाराची भेट घेऊन तिचे पालकत्व स्वीकारून तिला धीर दिला. तसेच शिक्षणात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये आपण सोबत आहोत. घाबरू नकोस मी पाठीशी आहे. असा संदेश जणू त्यांनी दिला आहे. या संदेशामुळे भाग्यश्रीची हिंमत दुप्पट वाढली आहे.

 नुकतेच चीन येथील जागतिक पॅरा अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भाग्यश्री जाधव हिने दोन कास्य पदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. नांदेड जिल्ह्यातील होनवडज येथील भाग्यश्री माधवराव जाधव या मुलीने अॅथलेटिक्स या प्रकारात यश संपादन केले आहे. भाग्यश्री जाधव हिला शिक्षणामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला, जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भाग्यश्री ने दोन कांस्य पदक पटकावले आहेत. तिच्या यशाचे कौतुक करत रामदास पाटील यांनी तिला हिम्मत दिली आहे. आणि तिच्या उच्चशिक्षणासाठी व प्रशासकीय कामासाठी आपण सर्वतोपरी आर्थिक मदत करणार असल्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यांच्यातील ही माणुसकी पाहून उपस्थित सर्व गहिवरून गेले. आज पर्यंत भाग्यश्रीला प्रकाश दादा कांबळे आणि गोरठेकर साहेब यांनी तिला सहकार्य केले होते. भविष्यात आपण ही तिच्या प्रत्येक अडचणीत सोबत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

 जपान येथील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ती एकमेव महिला खेळाडू म्हणून निवड झाली आहे. ती दिव्यांग आहे. दिव्यांगाचे दुःख काय असते? हे मी जाणतो, कारण मी सुद्धा दिव्यांग आहे. आणि दिव्यांगाची हिम्मत वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचीही घोषणा याप्रसंगी रामदास पाटील सुमठाणकर यांनी केली आहे.त्यांनी जपलेली ही सामाजिक जिणीव पाहुन समाजातील सर्व थरातुन रामदास पाटील यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.आज भाग्यश्रीला लाभलेल्या यशात पाटील यांनी दिलेला धीर आणि सहकार्य याचा सिंहाचा वाटा आहे,आसे म्हटले तर वावगे होणार नाही. सामाजिक जाणिवा जपणाऱ्या या आधिकाऱ्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

About The Author