क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सुरज कदम यांना गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान
अहमदपुर ( गोविंद काळे ) भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा पुरस्कार अहमदपूर तालुक्यातील तांबटसांगवी येथील सरपंच कालिदास कदम यांचे सुपुत्र सुरज कालीदास कदम यांना क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तलवारबाजी खेळात सर्वस्व झोकुन देऊन लातुर जिल्ह्याची मान सन्मानाने उंचावणारा कदम सुरज कालिदास तलवारबाजी या खेळात जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करून जिल्ह्याचा मान वृध्दिगंध केल्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा गुणवंत खेळाडू हा पुरस्कार प्रदान करून जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निवड करून सन्मान केला.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व धनादेश महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करून आज लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सत्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री मा.ना. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे, पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रा. दत्ता गलाले सर, सौ. रेवती कालिदास कदम यांची उपस्थित होती.