जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांच्या हस्ते ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियाना अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, झाडे लावणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.डॉ.बी.एस.होकरणे, प्रा.डॉ. मल्लेश झुंगास्वामी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.