भाकसखेडा येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते वृक्षाचा वाढदिवस व वृक्ष लागवड
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील भाकसखेडा येथे जुने गावठाण या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी ११००० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. याची सुरुवात त्यावेळी तत्कालीन तहसीलदार रामेश्वर गोरे व तत्कालीन गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन सपाटीकरणा पासून वृक्ष लागवडी पर्यंत व वृक्ष संगोपन करण्यासाठी विविध योजना करून संपूर्ण वृक्ष जगवले. त्याची पाहणी व वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तसेच नवीन वृक्षारोपण करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासोबत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर,गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्यासह अनेक अधिकारी वृक्षांची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. तसेच भाकसखेडा येथे आयोजित वृक्षाचा वाढदिवस हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन निमित्त यावेळी वृक्षाला राखी वर्षा ठाकूर घुगे यांनी बांधली केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच नवीन वृक्षारोपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचे २०० वृक्ष, बेलाचे ५ वृक्ष, इतर ८०० वृक्ष असे १००५ नवीन लागवड करण्यात आली. ११००० वृक्ष यापूर्वी सिने अभिनेते सयाजी शिंदे व राज्याचे मंत्री संजय जी बनसोडे यांच्या हस्ते लावण्यात आले होते. ११००० वृक्ष जगवले असता राज्याचे मंत्री यांनी भाकसखेडा गावाला पंधरा लाखाचा निधी बक्षीस म्हणून जाहीर केला. त्या निधीतून आई जगदंबा देवी मंदिराच्या बाजूला सभागृह बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी वृक्षाची पाहणी केल्यानंतर गावाविषयी गौरव उद्गार काढले. जितके वृक्ष लागवड झाली तितके व वृक्ष जगविले त्याबद्दल मंडळाधिकारी पंडित जाधव, दयानंद मोरे, लिंबाजी खेडकर, अरविंद मोरे यांचे अभिनंदन केले . येणाऱ्या काळात असेच आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. अशी सूचना यावेळी करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन विवेक जाधव, सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, तलाठी अंकुश वडगावे, राम जाधव, दयानंद मोरे, गोपाळ जाधव, सौदागर जाधव, संतुकराव जाधव, नरसिंह जाधव, ज्योतीराम जाधव, हनुमंत माणकेश्वरे, ज्ञान रोडगे, अभिजीत जाधव, कृष्णा बुरले, माधव जाधव, बब्रुवान कांबळे, राजेंद्र कांबळे, गुलचंद कांबळे, माधव सुर्यवंशी, रमण जाधव, पद्माकर तेलंगे, राम तेलंगे, भागवत जाधव, विजयकुमार जाधव, उद्धव कांबळे, नरसिंग जाधव, कैवल्या ग्राम संघाच्या प्रमुख रंजीता कांबळे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री जाधव, गुलाब पठाण, जनाबाई भुगे, मैनाबाई जाधव, अमर देवकते, विकास कार्यकारी वि का.सोसायटीचे सदस्य संदीप मोरे, विजयकुमार बुरले, सोजरबाई जाधव, अंगणवाडी कार्यकर्ता मीरा शिंदे, आशा कार्यकर्ता मीरा कांबळे , सत्यवान बुरले, माधवराव टेकपुंजे, रामेश्वर मोरे, सत्यवान जाधव, धनाजी मोरे, सरपंच अर्चना खेडकर, माजी सरपंच प्रकाश जाधव, माजी पोलीस पाटील रामभाऊ पाटील, उद्धवराव विश्वनाथ जाधव, रोहित जाधव, संजय कांबळे, काशिनाथ कांबळे, माजी सरपंच तुकाराम कांबळे, कमलाकर खेडकर ,अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष धोंडीराम कांबळे, सचिव सोपान कांबळे, बाबुन कांबळे यांच्यासह 29 महिला बचत गटाच्या महिला, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेअरमन विवेक जाधव यांनी केले. गावाच्या वतीने प्रस्ताविक मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी मांडले. उपसरपंच अरविंद मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.