शिवाजी महाविद्यालयात नवीन कायदेविषयक जागृती कार्यक्रम संपन्न

0
शिवाजी महाविद्यालयात नवीन कायदेविषयक जागृती कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदेविषयक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद नवले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर सत्र न्यायालयातील ऍड.योगेश्री स्वामी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात ऍड. योगेश योगेश्री स्वामी म्हणाल्या की, स्त्रियांवर होणारे अत्याचार आधुनिक काळातील मोठी समस्या असून या समस्यांना तोंड देण्यासाठी मुलींनी स्वतःहून सबल झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्व कायद्यांचे सखोल ज्ञान मुलींनी आत्मसात करणे आवश्यक आहे. आजच्या काळात मुलींवर होणारे बलात्कार त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक मुलीने सजग राहून त्याचा सामना करणे आवश्यक आहे. तसेच आपल्यावर जर अत्याचार कोणी करत असेल तर त्याला वाचा फोडण्याचेही काम त्यांनी केलं पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत असताना त्या पुढे म्हणाल्या, सरकारने जे नवीन कायदे आणलेले आहेत, त्याची माहिती सर्वांनी करून घेतली पाहिजे.या कायद्यामध्ये जे बदल झाले आहेत, त्यांची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.नवले म्हणाले की, स्त्रियांनी सजग राहून आपली सुरक्षितता व आपली प्रतिष्ठा जोपासने आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे कायदे सरकारने केले असून त्याचा आधार घेतला पाहिजे. त्यांनी भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचा उहापोह केला.आपण कसे सजग राहिले पाहिजे, त्याचीही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विष्णू पवार,महिला कक्षाच्या समन्वयक डॉ. उर्मिला शिरसी तसेच प्रा.शुभांगी पावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतर्गत तक्रार समितीच्या समन्वयक डॉ. अनुराधा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. यु के शिरसी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *