दयानंद कलाच्या लोकनृत्य व लोकगीताची राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड
लातूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने आयोजित लातूर विभाग स्तरावरील स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाने लोकनृत्य (लावणी) व लोकगीत (गोंधळ) या कलाप्रकारात सर्वप्रथम क्रमांक पटकावला. दि 3/1/2021 रोजी मुंबई विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
लोकगीत प्रकारात राजन सरवदे, कु. स्वरांजली पांचाळ, सचिन जाधव, ज्योतिबा बडे,कु.यशश्री पाठक, अधिराज जगदाळे व अनंत खलुले यांनी यशस्वी सहभाग नोंदवून यश खेचून आणले. लोकनृत्यात कु.ऐश्वर्या पाटील, कु.साक्षी आदमाने, कु.अरुणा आडे, कु.दीप्ती जाधव, कु.रूपाली हत्तरगे, कु तनुजा शिंदे यांनी आपल्या सुंदर व मनमोहक अदाकारीने लावणी सादर करून दयानंदच्या यशात मानाचा तुरा खोवला. डॉ संदीपान जगदाळे यांनी संघप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे नेतृत्व केले. यशस्वी स्पर्धकांना डॉ देवेंद्र कुलकर्णी, डॉ संदीपान जगदाळे, प्रा.शरद पाडे, सुरज साबळे, स्नेहा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कलाप्रकार सादरीकरणासाठी कु.कार्तिकी पाठक, कु.सिद्धी गोरे, कु.वैष्णवी वडगावे, सुदर्शन भुरे, अनमोल कांबळे, श्रीनिवास बरीदे यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा,रमेशकुमार राठी सरचिटणीस रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कृष्णा केंद्रे, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे व कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.