तलावात हात बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

तलावात हात बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

अहमदपूर ( गोविंद काळे )तालुक्यातील लातुर रोडवर शिरूरताजबंद शिवारातील महादेववाडी तलावात आज शनिवारी दुपारच्या सुमारास हात बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असुन सदरील ठिकाणी बघ्यांनी एकच तोबा गर्दी केली होती
याविषयी सविस्तर माहिती की, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद हे बिदर, हैदराबाद,निजामाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर रत्नागिरी, नांदेड, नागपूर या चौरस्त्यावरील शहरवजा गांव असुन दिवस रात्र वाहतूकीची वर्दळ असते.कधी कुठला नी कसला प्रकार घडेल याचा नियम नाही. शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी महामार्गावरील तलावात गेला असता काही तरी नवीन वस्तू असल्याचे जाणवले आणि येथील पोलिस चौकीस माहिती दिली.तात्काळ पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, बीट अंमलदार वैजेनाथ समुखराव,प्रशांत किर्ते,रमेश आलापुरे यांनी संबंधित स्थळास भेट देऊन परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन लातुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक यांना पाचारण करून बॉम्ब वर नियंत्रण ठेवण्यात आले.
सदरील हात बॉम्ब सदृष्य वस्तुची माहीती तुकाराम ज्ञानोबा वलसे रा.महादेववाडी यांनी दिली.त्यानंतर दहा वाजल्यापासून पोलिस प्रशासन व बॉम्ब शोधक व नाशक पथक तलावावर तैनात असुन तत्परतेने कारवाई करत आहे.सांयकाळच्या सात वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे आदेश मिळाले नव्हते.
” बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची वाट पाहत असुन सापडलेला बॉम्ब जुना असुन तो एकच असावा अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली.

About The Author