नागझरीचे सुपुत्र पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर यांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध

नागझरीचे सुपुत्र पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर यांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध

अहमदपुर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील नागझरी येथील सात सदस्यीय ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी नागझरीचे सुपुत्र व सध्या पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त पदावर असलेले मंचक ईप्पर यांनी मध्यस्थी केली.
ग्रामपंचायत निवडणुक जाहिर होताच ग्रामस्थांनी बैठक बोलावुन ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा केली. या बैठकीत ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव आला यावर सर्वांनी गावाच्या विकासासाठी एकमताने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध व्हावी असा निर्णय घेवुन ईतर गावांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. या बैठकीस प्राचार्य रामचंद्र ईप्पर, डॉ.रावसाहेब ईप्पर, निवृत्ती ईप्पर, नागनाथ ईप्पर, हनुमंत ईप्पर, व्यंकट ईप्पर, प्रल्हाद ईप्पर, बालाजी ईप्पर, अनंत ईप्पर, गंगाधर ईप्पर, ज्ञानोबा ईप्पर, नामदेव सुर्यवंशी, शाम सुर्यवंशी, प्रकाश ईप्पर, अंकुश आलापुरे, गंगाधर नकुले, उध्दव ईप्पर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत. गावातील भांडण-तंटे न होता भाईचारा टिकुन रहावे. गावाच्या सर्वांनींन विकास व्हावा, शाळा चांगली असावी व मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन व्हायला हवे तसेच प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत – मंचक ईप्पर (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड तथा सुपुत्र नागझरी)

About The Author