शिक्षकांसाठीच्या विभागीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

शिक्षकांसाठीच्या विभागीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

हेलस साने गुरुजी कथामालेचा उपक्रम

अहमदपुर ( गोविंद काळे ) : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस (ता.मंठा जि.जालना ) शाखेच्या वतीने शिक्षकांसाठी
आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेत सीमा बिराजदार यांनी प्रथम, शिरीष देशमुख यांनी द्वितीय, सुलभा मुंडे व अंबादास इंगोले यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर अतुल पाटील व गीतांजली कांबळे हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेचा अंतिम निकाल गुरुवारी (३१ डिसेंबर ) संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी जाहीर केला. यावेळी सहसंयोजक प्रा.डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

(कै) दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस (ता.मंठा जि.जालना ) शाखेच्या वतीने करोनो संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. महादेव आगजाळ, कीर्ती राऊत, पी.एस.देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील साबळे आर.आर.जोशी, राम तत्तापुरे डॉ.व्यंकटेश चौधरी, वाय.जी.बेंबडे, दिलीप श्रुंगारपुतळे, जी.सी.नेरे, संगिता देशमुख यांच्यासह कथामाला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

स्पर्धेचा निकाल असा :
प्रथम : सीमा आनंदराव बिराजदार ( जिल्हा परिषद प्रा.शा.कवठा,जि.जालना),
व्दितीय : शिरीष पद्माकर देशमुख ( जिल्हा परिषद प्रा.शा.माळतोंडी ता.मंठा जि.जालना ),
तृतीय ( विभागून ) : सुलभा पंडितराव मुंडे ( शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगपुरा, औरंगाबाद ) व अंबादास जनाजी इंगोले ( महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत जि.हिंगोली ),
उत्तेजनार्थ : अतुल अशोकराव पाटील ( नूतन विद्यालय, सेलू जि.परभणी ), गीतांजली प्रल्हादराव कांबळे ( माध्यमिक आश्रमशाळा,आथरवन पिंपरी तांडा, जि.बीड )
विजेत्यांना अनुक्रमे रोख पारितोषिक रुपये दोन हजार, दीड हजार, एक हजार व पाचशे रुपये तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे संयोजकांनी कळविले आहे.

About The Author