संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 1269 अर्ज मंजूर
उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर तालुक्यातील निराधार असलेल्या लाभार्थ्यांसाठी उदगीर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेतील 973 आणि संजय गांधी निराधार योजनेतील 296 असे एकूण 1269 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उदगीर तहसील कार्यात घेण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना (अपंग, विधवा, परितक्ता, अंतर्भूत पीडित हजार इत्यादी) आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
मंजूर लाभार्थी यांना संबंधित गावचे तलाठी यांच्यामार्फत नोटीस तामील करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही बाहेरील व्यक्तींशी संपर्क न साधता त्या गावच्या संबंधित तलाठी व तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी बैठकीत समितीचे सचिव तहसीलदार राम बोरगावकर, नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बंदर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अव्वल कारकून यू.पी. तिडके, डी आर फुटाणे, समाधान कांबळे आणि संजय गांधी निराधार योजना समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.