जिल्हा नियोजन मंडळावर भरत चामले

0
जिल्हा नियोजन मंडळावर भरत चामले

उदगीर (एल.पी.उगिले) : महाराष्ट्र कापूस फेडरेशनचे माजी संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन भरत तुकाराम चामले यांची लातूर जिल्हा नियोजन समितीवर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना संजय बनसोडे यांच्या सूचनेवरून निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासात्मक दृष्टिकोन असलेले आणि सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी-विक्री संघाचा वेगळा ठसा उमटवलेले भरत चामले हे लोकाभिमुख नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या या निवडीचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हा नियोजन मंडळामध्ये एक कल्पक आणि दूरदृष्टी असलेला नेता सहभागी झाल्यामुळे निश्चितच जिल्हा नियोजनाला दिशा मिळू शकेल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *