चामले आणि राठोड यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनचे माजी संचालक भरत चामले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश राठोड यांची निवड जिल्हा नियोजन मंडळावर झाल्याबद्दल विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी रामकिशन नादरगे, सुरेंद्र आकणगीरे, हनुमंत शेळके, बबलू घोणसीकर, व्यंकट पेठे, बाबुराव आंबेगावे, तातेराव शिंदे, अमोल पंडगे, विजय येडले, पंकज केंद्रे, भूषण कानवटे, विश्वजीत नादरगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना भरत चामले म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मंडळातून उदगीर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला जाऊ शकेल, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, असा विश्वास दिला.