साहित्यसम्राट अण्णाभाऊंचे विचार समाजाला प्रेरणा देणारे – विश्वजीत गायकवाड
उदगीर (प्रतिनिधी)
अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील उपेक्षित असलेल्या कष्टकरी मजूर यांच्या वेदना साहित्यातून मांडल्या.
त्यांच्या लेखणीतील ताकद विचारात घेऊन जगातल्या अनेक भाषांमध्ये त्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. कष्टकऱ्यांच्या वेदना हा केंद्रबिंदू ठेवून अण्णाभाऊ साठे यांनी लिखाण केले, आणि उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका त्यांनी कायम ठेवली. ते विचार आजही प्रेरणादायी आहेत, समाजाने ते विचार स्वीकारले पाहिजेत. समाजामध्ये सर्वधर्मसमभाव आणि आपण सारे एक आहोत, या भावनेने राहिले पाहिजे. असे विचार युवानेते विश्वजीत गायकवाड यांनी व्यक्त केले. उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून जनतेला मार्गदर्शन करत आहेत. नावंदी येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाचे प्रबोधन होईल असे विचार मांडले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ ब्रह्माजी केंद्रे, उदगीर नगरपालिकेचे माजी सभापती नागेश आष्टुरे आणि नावंदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नंतर लगेच विश्वजीत गायकवाड यांनी घोणसी येथे जाऊन तेथील कार्यक्रमांमध्ये देखील लोकप्रबोधन केले. अण्णाभाऊंचे विचार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. गावागावातून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे.