३० वर्षीय महीलेवर बलात्कार ; अहमदपूर पोलीसात अॅट्रॉसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सिंदगी खुर्द येथील एका ३० वर्षीय महीलेवर महत्वाचे काम आहे असे सांगुन अहमदपूर शहरातील एका लॉज वर बोलावून बलात्कार केला असल्याची घटना दि १२ सप्टेंबर रोजी घडली असून दि १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ : ३० वाजता अहमदपूर पोलीसात मध्यरात्री अॅट्रॉसिटी सह बलात्काराचा गुन्हा नोंद नोंद करण्यात आला आहे
याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील सिंदगी खुर्द येथील ३० वर्षीय महीला दि १२ सप्टेंबर रोजी अनुदावर शिलाई मशिन घेण्यासाठी ऑन लाईन नोंदणी करण्यासाठी अहमदपूर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर दुपारी १ : ३० वाजता थांबली असता त्याच गावातील महीलेच्या ओळखीचा असलेला एक इसम तेथे आला मला तुझ्या सोबत महत्वाचे बोलायचे बोलायचे आहे तु लॉज वर चल असे म्हणु लागला परंतु महीलेने नकार दिला आणी ती म्हणाली इथेच सांग काय महत्वाचे काम आहे परंतु काम अति महत्वाचे आहे असे सांगुन तो इसम त्या महीलेला लॉज वर सोबत घेऊन गेला व महीलेचे आधार कार्ड दाखवून पुढे रूम मध्ये गेल्या नंतर दुपारी ३ : ०० वाजता सदरील महीला रूम मध्ये गेली असता तो इसम म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करू म्हणून विश्वासात घेऊन महीलेचा नकार असताना सुद्धा बळजबरीने संभोग करून तुला काय करायचे ते कर म्हणून धमकी देऊन तेथुन पळून गेल्यानंतर सदर महीलेने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे फिर्याद दिली असता दि १३ सप्टेंबर रोजी मध्य रात्री १२ : ३० वाजता सदरील आरोपी इसमावर अहमदपूर पोलीसात गुरन नं ५४५ / २०२४ कलम ६४ बि.एन सह कलम ३ ( १ ) ( w) ( १ ) ( २ ), ३ ( २ )( v ) अ जा ज प्र अ नुसार अॅट्रॉसिटि सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर करीत आहेत