रूध्दा शिवारातील आखाड्यावर धाडसी दरोडा ; ६२ वर्षीय वृध्दाचा खुन
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रूध्दा येथील शेतातील आखाड्यावर अज्ञात तीन चोरट्यांनी दि १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ : ३० ते १ : ०० च्या दरम्यान चोरीच्या उद्देश्याने येऊन धाडसी दरोडा टाकून एका ६२ वर्षीय वृद्धाचा खुन करुन सोन्याचे दागीने रोख रक्कम मोबाईल असा एकूण ५३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना घडली असुन अहमदपूर पोलीसात तीन अज्ञात चोरट्यां विरूध्द चोरी दरोडा व खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की , अहमदपूर तालुक्यातील रूध्दा गावातील शेतकरी रावसाहेब केंद्रे वय वर्ष ६२ पत्नी उषाबाई केंद्रे वय वर्ष ५३ व मुलगा समाधान केंद्रे वय वर्ष २५ हे तिघे जण पाच वर्षा पासुन शेतातील आखाड्यावर राहत होते दि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी १० : ०० वाजता रावसाहेब केंद्रे व मुलगा समाधान केंद्रे रूध्दा गावातील गणपतीची आरती व प्रसाद घेऊन आखाड्यावर आले मुलगा समाधान केंद्रे हा त्या रात्रीच रूध्दा गावातील गणपती जवळ झोपण्यासाठी परत गेला रावसाहेब केंद्रे यांनी नेहमी प्रमाणे दुध डेअरी वर दुध देऊन रात्री ११ : ०० वाजण्याच्या सुमारास आखाड्यावर येऊन अंगणातील खाटेवर दोघे पती पत्नी झोपले असता दि १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२: ३० ते १ : ०० वाजण्याच्या दरम्यान खाटेवर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला डोक्यात कोणीतरी मारल्याचे लक्षात येताच पत्नी उषाबाईला जाग आली तेव्हा त्यांना काळसर रंगाचे तिघे जण दिसले पण त्याच वेळी त्यांच्या जबड्यावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून दात पाडले त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या सकाळी ६ : ३० वाजता शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी आपले पती रावसाहेब केंद्रे यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठत नव्हते ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असुन मयत झाले असल्याचे व गळ्यातील ५ ग्रॅमचे मनिमंगळसूत्र किमंत अंदाजे. ३०, ००० रु कानातील २ ग्रॅमचे फुले किमत अंदाजे ६००० रु कान फाडून व घरातील पिठाचे डब्यातील रोख रक्कम ५००० रुपये व मुलगा समाधान याचा मोबाईल जुना वापरता कि अं १२००० रु असे एकूण ५३००० रुपयाचा मुद्देमाल तिघांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर बाजुच्या वस्तीवर जाऊन दिर अन्नाराव केंद्रे यांना फोन लावुन घडलेली घटना सांगीतली व त्यांनी पोलीसांना माहीती दिली असता पोलीसांनी फिर्यादी उषाबाई रावसाहेब केंद्रे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिन चोर चोरट्याविरूध्द गुरनं ५५२/ २४ भारतीय न्याय संहिता ( बि.एन.एस २०२३ ) कलम ३०९ ( ६ ) , ३११, १०३ ( १ ) , १०९ , ३ ( ५ ) नुसार अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटना स्थळी आय.जी शहाजी उमाप अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजय देवरे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर पोलीस निरिक्षक बि. डि भुसनुर आदींनी भेट देऊन आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना केली आहेत