ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालक क्लिनर व पोलीसाला बेदम मारहाण

0
ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालक क्लिनर व पोलीसाला बेदम मारहाण

अहमदपूर ( गोविंद काळे )दररोज अहमदपूर ते पुणे जाणाऱ्या कृष्णा ट्रॅव्हल्स एम.एच ४४ ९३९३ ला रात्रीच्या वेळी अडवून ट्रॅव्हल्सच्या चालक व क्लिनर सह एका पोलीसाला बेदम मारहाण केल्याची घटना दि १४ सप्टेंबर रोजी रात्री ७ : १५ वाजता अहमदपूर -लातूर रोड वरील माधव मंगल कार्यालयासमोर घडली असुन अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याविषयीची पोलिस सुत्राकडून अधिक माहिती अशी की, दि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ : १५ वाजण्याच्या च्या दरम्यान दररोजच्या प्रमाणे कृष्णा ट्रॅव्हल्स क्र. एमएच ४४/ ९३९३ हि पुणे शहराकडे निघाली असताना दोन मोटार सायकलीवर अज्ञात पाच इसम ट्रॅव्हल्स समोर येऊन ट्रॅव्हल्स गाडी थांबवली असता ट्रॅव्हल्स च्या ड्रायव्हर नी समोर आडव्या गाड्या का लावल्या ? त्या काढा असे ड्रायव्हर नी अनोळखी व्यक्तींना सांगितले परंतू तेवढ्या वेळेत अज्ञात पाच जण ट्रॅव्हल्स समोर आडव्या लावलेल्या गाडया वरून उतरून ट्रॅव्हल्स मध्ये घुसून चालक व्यंकट परशुरान तरडे रा. थोडगा ता. अहमदपूर व क्लिनर गणेश पांचाळ व मॅनेजर देवानंद मोहटे आदींना शिवीगाळ करीत त्यामधील दोघांना डोक्यात, पाठीवर व उजव्या हातावर दगडाने मारहाण करण्यास सुरुवात करत चालकाच्या खिशामधील ५००० रुपये जबरीने काढून घेतले. त्यादरम्यान त्यामधील काही जणांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करुन ट्रॅव्हल्सचे समोरील, पाठीमागील व बाजुच्या काचा फोडू लागले त्यावेळी तेथे पोलीस कर्मचारी आले व त्यांनी जमलेल्या त्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे मुलांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतू त्या काचा फोडणाऱ्या मुलांपैकी एक जणांनी पोलीस कर्मचाऱ्यासही मारहाण केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले .
तेथे जमलेल्या लोकांपैकी एका प्रवाशांनी ट्रॅव्हल्स आडवून गाडीमध्ये शिरुन दगडाने मारहाण करणारे, गाडीच्या काचा फोडणारे व्यक्तींचे नावे स्वप्नील नरसन वलसे, गोपाळ शंकर वलसे, गजानन माधव वलसे, गणेश मोहन आरकीले , मंगेश मोहन आरकीले असे असल्याचे व ते थोरलेवाडी ता. अहमदपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. व तसेच चालकानी दिलेल्या फिर्यादीत गजानन माधव वलसे याने मला त्यांचे हातातील दगडाने मारहाण करुन माझे खिशातील ५०००/- रूपये काढून घेवून जखमी केले त्यानंतर स्वप्नील वलसे, गोपाळ वलसे, गणेश आरकीले व मंगेश आरकीले यांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करुन ट्रॅव्हल्सचे काचा फोडून अंदाजे ५००००/- रुपयाचे नुकसान केले असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारी म्हटले असून या प्रकरणी अहमदपूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३१०(२),३२४(४),३२४(५), ११८(१),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहमदपूर पोलिस स्टेशनचे पो.उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!