डेक्कन शालेय परिसरात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे दुर्लक्ष

0
डेक्कन शालेय परिसरात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे दुर्लक्ष

डेक्कन शालेय परिसरात घाणीचे साम्राज्य, प्रशासकाचे दुर्लक्ष

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील उर्दू माध्यमांची एक नामांकित शाळा असलेल्या डेक्कन प्रायमरी आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण देणारी उर्दू माध्यमातील नामांकित शाळेचा परिसर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे बहुचर्चित आहे. वास्तविक पाहता शालेय परिसरामध्ये स्वच्छता अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्याचे भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना या घाणीमुळे साथीचे रोग होऊ शकतात. इतर आजाराला मुले बळी पडू शकतात. त्याचे गांभीर्य नगरपालिकेला नाही. ना नगरपालिका प्रशासनाला आहे. सद्यस्थितीत नगरपालिका ही प्रशासका मार्फत चालू असल्याने त्यांना विचारावे कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 9 जुलै 2024 रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय उदगीर यांना रीतसर निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती. या शालेय व्यवस्थापना सोबतच परिसरातील नागरिकांनीही प्रशासनासोबतच राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांना देखील निवेदन दिले होते. मात्र दुर्दैवाने सध्या राजकारणाची धावपळ सुरू असल्याने ना मंत्री महोदयांना या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ आहे, ना प्रशासनाला वेळ आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना एक तर दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय, सोबतच डास उत्पत्तीची पूर्ण प्रक्रिया होईल असे कचऱ्याचे ढीगच्या ढीग शाळेला लागूनच साचलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधीमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नाकाला रुमाल लावून चालत असले तरी डास आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगांचा बचाव विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कसे करावा ? हा मोठा प्रश्न आहे. थोडा जरी पाऊस झाला तर या परिसरात पाणी साचते आणि पुन्हा या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या विद्यार्थ्यांच्या सोबतच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या शालेय परिसराच्या जवळच एका नागरिकांनी बांधकाम काढले असून त्या बांधकामाचे साहित्य हे रस्त्यावर टाकले आहे. जो रस्ता विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी आहे, त्या रस्त्यावर अशा पद्धतीचा बांधकामाच्या साहित्याचा ढिगारा म्हणजे विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून चालताना कसरत करत चालावे लागते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर उपचार करावा, दुर्गंधी दूर करावी, कचरा वेळच्यावेळी उचलला जावा. अशी नागरिकांची रास्ता अपेक्षा आहे.
विशेषतः या शाळेचे हितचिंतक आणि पालक असलेल्या अब्दुल गफार मोहम्मद सरवर बागवान, नदीम देशमुख, आजम बागवान, जबाब पठाण, फिरोज चौधरी, सादिक राठोडे, अब्दुल हमीद अब्दुल चौधरी, अरबाज युसूफ बागवान, सलीम शेख, रियाज हाश्मी, सय्यद काझी, हमद बागवान इत्यादींनी स्वाक्षऱ्या करून शालेय प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनाही निवेदन दिले आहे.
मात्र दुर्दैवाने या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे कोणीही लक्ष देताना दिसून येत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. या परिसरातील नागरिकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे की, जर वेळेच्या आत हा कचरा उचलला नाही गेला तर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि जीविताचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून तीव्र आंदोलन करावे लागेल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *