हॉस्टेल कामगाराच्या लेकराचे वैद्यकीय प्रवेशासाठी लोक झाले मायबाप!

0
हॉस्टेल कामगाराच्या लेकराचे वैद्यकीय प्रवेशासाठी लोक झाले मायबाप!

हॉस्टेल कामगाराच्या लेकराचे वैद्यकीय प्रवेशासाठी लोक झाले मायबाप!

मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंद शेळके यांनी समाज माध्यमातून आर्थिक मदतीचे केले होते आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : एका हॉस्टेल वरील कामगाराच्या मुलाचे वैद्यकीय (एमबीबीएस) प्रवेशासाठी पहिल्याच यादीत पात्र ठरूनही केवळ घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने ओम आडकिने या होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची भीती निर्माण झाली होती.त्याचे स्वप्न साकार होण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात देऊन आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोविंद शेळके यांनी समाज माध्यमातून केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मायबाप जनतेमुळे अखेर त्या विद्यार्थ्याचा पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज अमरावती येथे एम.बी.बी.एस साठी प्रवेेश निश्चित झाला.

   या विषयीची सविस्तर माहीती अशी की, गुंटूर  ता. जि. नांदेड येथील रहिवासी असलेले सुरेश अडकीने हे नांदेड मधील एका हॉस्टेल मध्ये दोन वर्षापासून कामाला आहेत. त्यांचा मुलगा ओम याने १२ वी चा अभ्यास  करून 'नीट' परिक्षेत ६१३ गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले असले तरी यावर्षीच्या वाढत्या कट ऑफ मुळे ६१३ गुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकला नाही. निम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पात्र ठरूनही प्रवेश घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नावर पाणी सोडण्याची वेळ आली होती.ओमचे वडील सुरेश आडकीने रा. गुंटूर ता. जि. नांदेड यांनी अहमदपूर येथील मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.गोविंद शेळके  व कंधार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव कुटे सर यांना संपर्क करत आपली कैफियत मांडली, व आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. प्रा. शेळके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन संबंधीत मुलाच्या कुटूंबीयांची चर्चा करून तातडीने समाज माध्यमावर मदतीचे नम्रपणे आवाहन केले. ओमला पुढील दोन दिवसांमध्ये सात लाख रुपये रक्कम जमा करावयाची होते परंतु त्याच्याकडे सध्या फक्त दोन लाख रुपये जमा झाले होते.उर्वरित रक्कम जमा न झाल्यास जिद्दीने अभ्यास करणाऱ्या ओमच्या मेडिकल प्रवेशाची संधी हुकू नये याकरीता  स्वेच्छेने आर्थिक मदत पाठवण्याचे आवाहन करत अडकीणे याचा अकाउंट नंबर व फोन पे नंबर दिला होता. यानंतर अनेक राजकीय, सामाजीक व संवेदनशील नागरिक त्या मुलाचे मायबाप होण्यास पुढे सरसावले.

जमा झालेला जवळपास तीन लाख रूपयाचा निधी त्याच्या खाती परस्पर जमा करण्यात आला. विशेष म्हणजे या सत्कार्यास सर्वच स्तरातून देणगी मिळाली. गरीबाच्या लेकराचे वैद्यकीय शिक्षणाचा (एम.बी.बी.एस.) प्रवेश निश्चित झाला. शिवाय समाजामध्ये अजून माणुसकी जिवंत आहे याची प्रचिती आली. विविध स्तरातून समाज माध्यमांचे व विद्यार्थीनींचे कौतूक केले जात असुन समाज माध्यमाचा असाही चांगल्या कामासाठी उपयोग होऊ शकतो, हे पुन्हा एकदा प्रा.गोविंद शेळके यांनी सिद्ध करून दाखवल्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

ऐसे ही कारवा नही रुकता…. देखा ये भी जाता है की आवाज किसने दी…!

सालगड्याच्या मुलीचे लोक झाले होते मायबाप

यापूर्वी २२ फेबुवारी २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रा.गोविंद शेळके यांनी एका सालगड्याच्या मुलीला मेडिकलच्या प्रवेशासाठी संवेदनशील लोकांना साद घातली आणि एका रात्रीतून लोकांनी साडेतीन लाख रुपये गोळा करून ( लोकवाटा ) सालगड्याच्या मुलीचा मेडिकलचा प्रवेश निश्चित केला. आ मुलगी जळगाव येथे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज मध्ये एम.बी.बी.एस. च्या तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. .. ! तिने ‘नीट’ परिक्षेत ५४९ गुण मिळवून जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *