मराठवाडा समृद्धीसाठी कटिबद्ध होण्याची गरज -विश्वनाथ मुडपे.
उदगीर (प्रतिनिधी)अनेक देशभक्तांच्या त्यागामुळे
तुरुंगवास व बलिदानामुळे मराठवाडा मुक्त झाला.
त्यांचे स्मरण करून आता मराठवाडा शिक्षण,शेती, उद्योग व आरोग्य क्षेत्रात मराठवाडा समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध होण्याचे आवाहन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरूजी यांनी केले. डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात संस्था सचिव देविदासराव नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूर्यकांतराव पांचाळ गुरुजी उपस्थित होते. तत्पूर्वी विश्वनाथराव मुडपे गुरूजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी राजश्री सोमवंशी, ओमकार फफागिरे, सावली सोमवंशी, अनुश गायकवाड, अरषेद शेख, अक्षरा बारुळे , दुर्गा चिट्टे या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आपल्या भाषणातून माहिती दिली, तसेच देशभक्तीपर गीत गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बिराजदार यांनी केले .प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांनी तर आभार वर्षाताई पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल्लता बोडके, मनोरमा तेलंगे, सुनिता शिंदे, हेमा कुलकर्णी, वर्षा बिरादार ,प्रशांत पांचाळ, शशिकुमार पाटील, गोविंद रावळे,विठ्ठल नादरगे, अमोल कांबळे यांनी परिश्रम घेतले.