प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण…”
उदगीर (प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे अनावरण भुवनेश्वर, ओडीसा येथून संपन्न झाले. सदर कार्यक्रमास उदगीर नगरपरिषदे अंतर्गत पात्र लाभार्थी यांची दृकश्राव्य च्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उदगीर नगरपरिषद चे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या शुभहस्ते उपस्थित लाभार्थी पैकी ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्यांना प्रातिनिधिक स्वरुपात गृहप्रवेश म्हणून घरकुलाची चावी देवून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करताना आपले घर, गल्ली, परिसर स्वच्छ ठेवावे. आपला कचरा विलगीकरण करूनच घंटागाडी मध्ये द्यावा. जबाबदार नागरिक म्हणून वेळेत घर व पाणी पट्टी भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन केले.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे विविध माहितीपत्रकाचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर व उपस्थित लाभार्थी यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याधिकारी सतीश बिलापट्टे, विभाग प्रमुख गुरुप्रसाद लोणारे यांच्या मार्गदर्शनानुसार सीएलटीसी स्थापत्य अभियंता सिद्धिकी मिसबाह, शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुल्यांक व सनियंत्रण तज्ञ शिवशंकर मटके यांनी केली तर उपस्थितांचे आभार शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी मानले.