कासार सिरसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !!अल्पावधीत गाजत आहेत पोलीस अधिकारी !!

0
कासार सिरसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !!अल्पावधीत गाजत आहेत पोलीस अधिकारी !!

पोलीस प्रशासनाचे कामच सर्वसामान्य जनतेच्या जीविताचे आणि संपत्तीचे संरक्षण करणे आहे. असे सर्वसामान्यपणे समजले जाते, आणि ते खरे असले तरीही सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना विविध गुन्ह्यांचा शोध घेणे आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचणे, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवणे. हे शक्य होतेच असे नाही. मात्र कासार शिरशी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट तपासाचा निश्चित आवर्जून उल्लेख करावा लागतो, किंबहुना त्यांचे कौतुकही करावे लागेल.
दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी कासार शिरसी पोलीस स्टेशन येथे हाजी बाबू मिया शेख यांनी तक्रार दिली की, आपल्या एम एच ट्रेडिंग या दुकानातून 32 कट्टे चोरीस गेले आहेत. ज्यामध्ये प्राधान्याने सोयाबीन, हरभरा आणि तूर या धान्याच्या कट्ट्याचा समावेश आहे. या तक्रारीनंतर कासार शिरशी पोलीस स्टेशन येथे 210/24 प्रमाणे कलम 331 (4) 305 (A) प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.
अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा नोंद असला तरी पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवायला सुरुवात केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कासार शिरशी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, नामदेव चामे, पो.ह. घोरपडे, श्रीकांत वरवटे, किशोर तपसे, केशव ढोणे, पो.का. बळीराम मस्के, इलाही पठाण यांनी तपास करायला सुरुवात केली.
अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळवायला सुरुवात केली. गुप्त बातमीदारांची ही मदत घेतली. तेव्हा त्यांना संशयीत म्हणून शहाजी मच्छिंद्र माने (वय 39 वर्ष राहणार कोळीवाडा तालुका उमरगा धाराशिव), लक्ष्मण गोविंद माने (वय 24 वर्ष राहणारस स. चिंचोली निलंगा), सुभाष दिलीप स्वामी (वय 21 वर्ष राहणार डिगी रोड उमरगा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी स्पष्ट कबूल केले की, त्यांचा आणखी एक साथीदार सागर मच्छिंद्र माने हा देखील आहे. तेव्हा या पथकाने सागर मच्छिंद्र माने (वय32 वर्ष राहणार कोळीवाडा उमरगा तालुका उमरगा) यास उमरगा येथून अटक केली.
चोरीस गेलेल्या मालाच्या संदर्भात त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी आपण कासार शिरशी येथील सोयाबीनचे, हरभऱ्याचे आणि तुरीचे कट्टे चोरल्याची कबुली दिली. तसेच 32 कट्टे ज्याची किंमत 69 हजार 500 होते. ते पोलिसांच्या हवाली केले. तसेच याच चोरांनी किल्लारी परिसरातील ही अशाच स्वरूपाची चोरी केल्याचे कबूल केले, आणि किल्लारी येथील गुरं 267/ 24 गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. त्यामुळे कासार शिरशी पोलिसांनी आपल्या हद्दीतील गुन्ह्याचा तर शोध लावलाच लावला, किल्लारी परिसरातील देखील झालेल्या चोरीचा शोध लावून मुद्देमाल जप्त केला. त्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *