मातंग समाजात स्मशानभूमीचे निकृष्ट काम थांबवा — भाजपा नेते रुपेश चव्हाण
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील फुलेनगर भागात मातंग स्मशानभूमीच्या प्रतीक्षालयाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून प्रत्यक्ष कामाची पाहणी करून पिल्लरला लावलेल्या सळई चे तुकडे साध्या काठी धक्का दिला तरी, गळून पडत आहेत. त्यामुळे असे निकृष्ट काम तात्काळ थांबवावे. आणि दर्जा नियंत्रकांकडून कामाची तपासणी करून घ्यावी. अशा पद्धतीची मागणी भाजपचे नेते
रुपेंद्र चव्हाण यांनी उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाज स्मशानभूमी फुलेनगर येथील ही जागा मातंग समाज बांधवांनी खरेदी करून घेतलेली आहे. स्मशानभूमी सारख्या ठिकाणच्या कामाला तरी दर्जा द्यावा, त्या ठिकाणी कमिशन खाऊ नये. नगर परिषदेने त्या ठिकाणी ज्या गुत्तेदारामार्फत स्मशानभूमीत दोन वेटिंग शेड बांधण्याचे अनुक्रमे नऊ लाख 60 हजार याप्रमाणे एकूण 19 लाख 20 हजार रुपयांचे काम सुरू केले आहे. जे अंतिम टप्प्यात आहे. हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. निविदेतील नियम अटीच्या अधीन राहून हे काम झालेले नाही. पिल्लर मध्ये सिमेंट व लोखंडी सळ्या तुटून पडत आहेत. तसेच वाळू ऐवजी सिल्कोट भुकटी आणि सहा एमएम सळई चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सदरील गुत्तेदाराचे बिल अदा करण्यापूर्वी दर्जा नियंत्रण अधिकाऱ्याकडून दर्जा तपासून घ्यावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.