मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहासाची जनजागृती आवश्यक — सुशांत शिंदे
उदगीर (प्रतिनीधी):- मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रेरणादायी असून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे काळाची गरजेचे आहे.उदगीरमध्ये या पातळीवर होणाऱ्या सामाजिक प्रयत्नांना प्रशासनाची निश्चित साथ राहील. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीर च्या वतिने हुतात्मा स्मारक येथे हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी तहसीलदार राम बोरगावकर,नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर,मजवीपच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया,उपाध्यक्ष प्रा.एस.एस. पाटील,श्यामलाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य,अंजुमनी आर्य,साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, दक्षिण मध्य रेल्वे समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे,मुरलीधर जाधव,माधव खताळ ,राम मोतीपवळे,विश्वनाथ बिरादार,दिपक बलसुरकर,माधव कल्याणकर,गणेश मुंडे, गोपाळ कांबळे,यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन मजविप च्या वतिने सत्कार करण्यात आला.यावैळी विजयकुमार बैले यांनी मराठवाडा गीत सादर केले.
पुढे बोलताना हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून उभा राहिलेला इतिहास नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारा असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले. तहसीलदार राम बोरगावकर यांनी यावेळी बोलताना मुक्तिसंग्रामातील प्रेरक प्रसंग सांगून या संदर्भात रचनात्मक काम होण्याची गरज प्रतिपादन केले.रजाकार काय होता? तो काळ खुप वाईट होता. आपली वडीलधारी मंडळी सांगत असताना ऐकतेवेळी भिती वाटायची.या गोष्टीचा साक्षीदार आमचे गाव पण आहे. असे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी सांगितले.मुक्ती संग्रामाचा स्थानिक इतिहास दुर्लक्षित असून तो प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे. असे मत धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.उदगीर येथे मुक्ती संग्रामाच्या संदर्भाने स्मारक होण्याची गरज अँड.सुपोषपाणि आर्य यांनी व्यक्त केली.
मराठवाडा संघर्षातून मुक्त झाला आहे.यातील काही दुर्मीळ आठवणी हुतात्मा स्मारकात प्रदर्शनासाठी दोन दिवस ठेवण्यात आले असून यांचा उदगीर शहरातील व परिसरातील विद्यार्थी व नागरीकांनी याचा लाभ घ्यावे असे ही आवाहन डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.एस.एस. पाटील यांनी केले.सूत्रसंचालन व आभार माधव खताळ यांनी मानले.