महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन
उदगीर (प्रतिनिधी) जळकोट शहर व तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे, पीकांचे व पशुधनाचे नुकसान झाले. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकार म्हणून आपण संकटात सापडलेल्या लोकांना तात्काळ मदत करावे यासाठी उदगीर तालुक्यातील सर्व चेअरमन संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन दिले, त्याच पद्धतीने उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व नुकसान भरपाई मिळावी म्हणून जळकोट महाविकास आघाडीच्या वतीने जळकोट तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी आज खुप मोठ्या संकटातून जात आहे. मागच्या चार वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी पीकांवर होणारा रोगांचा प्रदुर्भाव त्यातच खते व बी-बियाणे यांचे वाढलेले किंमती आणि बाजारात पडलेल्या
शेतमालाच्या किंमती व विमाकंपनीकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाची पावले उचलत
आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रु. अनुदान शासनाने जाहीर केले असून ते अनुदान शेतकरी बांधवाच्या खात्यावर जमा करावे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून
सर्वांना पीकविमा दयावे आदी मागण्यांचे निवेदन
महाविकास आघाडी चेअरमन संघटनेना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार, जळकोट यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास भव्य शेतकरी मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी जळकोट तालुका काँग्रेस
अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, शीला पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट
तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर देवरे, माजी सभापती बालाजी तांकबिडे, नगरसेवक संग्राम नामवाड, व्यंकटराव केंद्रे, ज्ञानबा मालुसरे, प्रशांत पाटील, गंगाधर
गिरधवड, धनराज दळवे, धनराज पिंजारी, वैजनाथ
पाटील, गोपाळ चव्हाण, नागनाथ पाटील, मुजमिल नागरगोजे आदी उपस्थित होते.