संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्व समजून घेणे गरजेचे – प्रा राजेंद्र गुळवे
अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाघाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्व प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे असून यासाठी प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे व अंगीकारले पाहिजे असे मत प्रा . राजेंद्र गुळवे यांनी अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्रातील 434 आय टीआय मध्ये संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनकड व कौशल्य ,रोजगार , उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन केले.
अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ही याच वेळी संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी शिवानंद हेंगणे, नायब तहसीलदार बनकर सर,प्राचार्य शिवाजीराव कवलेकर, प्रा मोरे सर , प्रा राजेंद्र गुळवे, ऍड उप्पे, श्रीकांत मजगे शिवाजीराव देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा मोरे, एडवोकेट उप्पे, यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमात पुढे बोलताना राजेंद्र गुळवे सरांनी संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून न्याय देण्याचे कार्य संविधानाने केले आहे. यासाठी आपण सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिवानंद हेंगणे यांनी संविधानामुळे महिला पुरुष यांना समान अधिकार मिळाले ,भारतात प्रत्येकाला संविधानामुळे स्वतःचे मत बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य शिवाजीराव कवलेकर यांनी करताना संविधान व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिल चवळे यांनी केले तर आभार सुरवसे सर यांनी मांडले.
या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काकनाटे सर, अनवले सर, बोरोळे सर, मस्के मॅडम, लोकरे सर, पठाण सर, जांभळे मॅडम, लवटे सर, आचमे सर, सी व्ही जाधव, बाबुराव श्रीमंगले,पत्रकार सोमवारे, राठोड सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात शहरातील सर्व कौशल्य विकास संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी ही उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.