जाळीत गुंतलेल्या काळविटाला दिले जीवदान जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुपचे शर्तीचे प्रयत्न

0
जाळीत गुंतलेल्या काळविटाला दिले जीवदान जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुपचे शर्तीचे प्रयत्न

जाळीत गुंतलेल्या काळविटाला दिले जीवदान जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुपचे शर्तीचे प्रयत्न

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पासून जवळच असलेल्या मरशिवनी गावाच्या शिवारात सुहास कल्याणी यांच्या शेतात लावलेल्या जाळीत काळवीटाची शिंगे अडकल्याने जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुपच्या सदस्यानी या काळविटाचे प्राण वाचऊन त्याला जीवदान दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुप चे सर्व सदस्य दररोज सुहास कल्याणी यांच्या प्लॉटिंगच्या शेतामध्ये व्यायाम व योगसाधनेचा वर्ग चालवतात या शेतात मुगाचे व उडीदाचे डुकरा पासून संरक्षण व्हावे म्हणून जाळी लावण्यात आली होती याच जाळीमध्ये सकाळी सहाच्या सुमारास एक काळवीट जाळीत अडकून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसले. फिरून फिरून जाळीत शिंगे पूर्णतः अधिकच घट्ट आवळली गेली होती.तोंडातून रक्त येत होते हे काळवीट स्वतःची सुटका करून घेण्यासाठी व्याकूळ झाले होते.जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील व विकास कराड यांनी या काळविटाला पाहिल्यावर पहिल्यांदा माया ममतेने त्याला कुरवाळण्याचा प्रयत्न केला ते एवढे थकले होते की तरीही जवळ येऊ द्यायला तयार नव्हते. हळुवारपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवल्यावर त्याला ही बरे वाटले स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ते कासविस झाले तरी तोंडातून काहीच आवाज येत नव्हता. जाळीने त्याचे तोंड पूर्णता आवळून गेले होते.
काळवीट फिरून फिरून स्वतःला अधिकच गुंतवत गेले होते.एवढे थकले होते अक्षरशः कळविटाच्या अंगातून घाम बाहेर पडत होता काळवीटाची सुटका करून देण्यासाठी सर्व मित्र परिवारांना एकत्र केले.रमेश चव्हाण यांनी ती जाळी विळ्याने कापून काढली त्यावेळी त्या काळवीटाने सुटकेचा श्वास सोडला.पूर्ण जाळी कापल्यावर ते उठायला तयार नव्हते. त्याला पाठीमागून आधार देऊन उठवले आणि पाहता पाहता या मृत्यूच्या जाळ्यातून त्यांनी स्वतःची सुटका झाल्याचे त्याला समजताच ते शेत शिवारात एका क्षणात पसार झाले.
यावेळी जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारोती बुद्रुक पाटील, सदस्य विकास कराड,प्रा. रेशमाजी केंद्रे, प्रा. धोंडीराम कुंभारे,अॅड जगदीश पौळ, राजकुमार पौळ,सोपान मुलूमवाड, रमेश चव्हाण,अविनाश चव्हाण,अमित चव्हाण या सर्व मित्र परिवारांनी या काळवीटाला जीवदान दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *