अहमदपूरच्या ओम शांती केंद्रात अनोखा उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या देशात सबंध मानव जातीने पर्यावरण संतुलनाची म्हणावी तशी काळजी न घेतल्यामुळे सबंध पृथ्वीतलावर समस्या निर्माण झालेल्या असून त्या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी घराघरात आणि मनामनात पर्यावरण संतुलनाविषयी सजगता बाळगावी आणि ओम शांती केंद्राच्या वतीने चालविण्यात आलेल्या प्रकृती पर्यावरण व आपदा प्रबोधन जनजागृती अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन पानिपतचे राजीयोगी भारत भूषण भाई यांनी केले.
ते दि.18 रोजी ईश्वरीय विश्व विद्यालयात आयोजित प्रकृती पर्यावरण व आपदा प्रबंधन जनजागृती अभियान सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, राज योगिनी सुप्रिया बहन, राज योगिनी छायाबहन, ब्रह्मकुमार महेश भाई, ब्रह्मकुमार रामनाथ भाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर म्हणाले की, आत्मशांतीसाठी ईश्वराचे नामस्मरण करणे गरजेचे असल्याचे सांगून भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा मानवाने जागृत राहिले पाहिजे असे सांगितले.
या समयी राज योगिनी सुप्रिया दीदी, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजयोगिनी छाया बहिणजी यांनी सूत्रसंचालन राजयोगिनी सुलक्षणा बहिण यांनी तर आभार जितूभाई यांनी मांनले.
या सोहळ्याला उद्योजक विजय गुंडाळे, राम तत्तापुरे, जीवनराव कराड प्रा. बालाजी कारामुंगीकर, आशा रोडगे, महादेव खळूरे यांच्यासह महिला व पुरुष साधकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी ब्रह्मकुमार महेश भाई यांनी पर्यावरणाची उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण गिताने करण्यात आला.