बालाघाट महाविद्यालयात प्रकृती आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियान संपन्न

0
बालाघाट महाविद्यालयात प्रकृती आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियान संपन्न

बालाघाट महाविद्यालयात प्रकृती आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियान संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अहमदपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रकृती पर्यावरण आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम बालाघाट अभियांत्रिकी महाविद्यालय रुद्धा, अहमदपूर या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई हाके या होत्या. तर या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बीके भरतभूषण भाई , बीके महेश भाई, बीके रामनाथ भाई ,बीके जितेंद्र सर, बीके सुप्रिया दीदी,बीके छाया दीदी,बिके सुलोचना बहेन, शोभा टोम्पे, शिवालिका हाके तसेच बालाघाटचे प्राचार्य कोपनर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बालाघाट परिसरामध्ये पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भरतभूषण भाई म्हणाले पर्यावरणाचा असंतुलन याचे कारण म्हणजे आपण जे प्रदूषित घटक वातावरणामध्ये टाकत आहोत तेच होय आणि सुविधा भरपूर झाल्यामुळे प्रत्येक बाबीचं महत्त्व कमी झाल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये प्रदूषण होत आहे. मानसिक प्रदूषण सर्वात मोठे प्रदूषण असून हे दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक आहे. तसेच महेश भाई यांनी सुद्धा प्रदूषणाचे महत्त्व सांगितले तर सोमनाथ भाई यांनी वृक्ष लावा देश वाचवा असा संदेश दिला‌ यावेळी सुप्रिया दीदी म्हणाल्या नैसर्गिक आपत्ती ही मनुष्यनिर्मित आपत्ती असून त्याच्या सुरक्षेसाठी आध्यात्मिक शांती शिवाय पर्याय नाही. तर छाया दिदी यांनी ओम शांती केंद्राचे महत्व कार्य विशद करत पर्यावरणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा हाके म्हणाल्या की वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून नैसर्गिक आपत्ती दूर करणे आवश्यक आहे पर्यावरणाचे रक्षण करायचा असेल तर वृक्ष लागवड व संवर्धन अतिशय आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्या देवकते यांनी केले तर आभार प्रा. संतोष लातूरे यांनी मानले कार्यक्रमाला अहमदपूर व परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *