तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसादात चरबी मिसळल्याच्या निषेर्धात निवेदन

0
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसादात चरबी मिसळल्याच्या निषेर्धात निवेदन

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसादात चरबी मिसळल्याच्या निषेर्धात निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला तेलंगणा येथील नित्यभोग आराधना (प्रसाद) मध्ये प्राण्याची चरबी मिश्रीत तुप वापरुन प्रसाद तयार करुन देशातील सर्व हिंदूंच्या भावना दुखवल्या असल्याच्या निषेर्धात व दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अहमदपूर सकल हिंदु समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की, तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला तेलंगना येथील नित्यभोग आराधना (प्रसाद) मध्ये प्राण्याची चरबी मिश्रीत तुप वापरुन प्रसाद तयार करुन देशातील सर्व हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत. प्रसाद बालाजी भक्तांना वाटप करुन धर्म भ्रष्ट करण्याचे षडयंत्र अधर्मीयांनी केले असुन या घटनेचा निवेदनाद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत. तसेच निवेदनाद्वारे आमच्या शासनाकडे काही मागण्या अशी मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे

१) देशात अधर्मीय लोकांना मंदिराच्या ट्रस्टवरील प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्यात येवू नये.

२) सनातन हिंदू बोर्डची स्थापना करणे.

३) अधर्मीयांना हिंदू धर्मस्थळातील व परीसरात येण्यास बंदी घालणे.

४) देशातील हिंदू धर्मातील देवस्थानांना शासनाच्या अधिपत्याखालून मुक्त करण्यास बील पास करावे.

बालाजी मंदिर तिरुमालामधील प्रसादात प्राण्याची चरबी मिश्रित तुप तयार करणारे व करण्यास भाग पाडणारे यांच्यावर योग्य ती फौजदारी कारवाई करावी व सदरचे निवेदन आपल्या वरिष्ठाकडे पोहंचवून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
निवेदनावर अॅड स्वप्नील व्हत्ते, नरेश यादव, मधुकर धडे, भुषन यादव, जुगलकिशोर सोनी, शामसुंदर भुतडा, जुगलकिशोर शर्मा, धनंजय चाटे, आनंद बाहेती, गोविंद गुडे, आनंद पंडगे, संतोष काडवादे, ईश्वर चापकानडे, घृष्णेश्वर निजवंते, बालाजी खंदाडे, कदम शिवकुमार, कदम गोविंद, भताने ज्ञानोबा, यशवंत खाकरे, सोनी वरद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *