सकल लिंगायत समाजाच्यावतीने खासदारांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : सकल लिंगायत समाज उदगीरच्या वतीने खा.डाॅ.शिवाजी काळगे व खा.सागर खंड्रे यांचा सत्कार संपन्न झाला. रघुकूल मंगल कार्यालयात सकल लिंगायत समाज उदगीर च्यावतीने ना.संजय बनसोडे यांच्या उपस्थितित लातूरचे खा.डाॅ.शिवाजी काळगे, बिदरचे खा.सागर ईश्वर खंड्रे यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर भवन निर्माण चे निमंत्रक सौ गुणवंती मिठारे या होत्या तर प्रमुख पाहुणे माजी आ.गंगाधर पटणे, माजी आ.प्रा.मनोहर पटवारी, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, जि.प. माजी सदस्य बसवराज पाटिल कौळखेडकर, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,विजयकुमार स्वामी आदी उपस्थित होते.प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. प्रास्ताविकात राम मोतीपवळे यांनी सत्कारा मागील भुमिका विषद करुन उदगीर येथे महात्मा बसवेश्वर भवनच्या माध्यमातून वचन साहित्य संशोधन केद्र, स्टडी सेंटर, स्पर्धा परिक्षा केंद्र, विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह, निर्माण व्हावे या उद्देशाने महात्मा बसवेश्वर भवन व्हावे यासाठी सकल लिंगायत समाजाची स्थापना झाली असुन या पुढिल काळात वधूवर परिचय मेळावा,विविध क्षैत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लिंगायत समाजातील व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी स्वागत समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले तर ना.संजय बनसोडे ,खा.डाॅ.शिवाजी काळगे, खा.सागर ईश्वर खंड्रे यांचा महात्मा बसवेश्वरांची मुर्ती व वचन साहित्याची प्रत देऊन समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना खा.डाॅ.शिवाजी काळगे म्हणाले की, समाजाच्यावतीने केला जाणारा सत्कार ऊर्जा देणारा असुन समाजाच्यावतीने राबवण्यात येणार्या उपक्रमासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगून जनतेने केव्हा ही हाक द्या, सेवेसाठी हजर राहण्याचे अभिवचन दिले.बिदरचे खा.सागर ईश्वर खंड्रे म्हणाले की, सकल लिंगायत समाजाच्या सत्काराने भारावून गेल्याचे सांगून बिदर जिल्हाचे उदगीरशी स्नेहाचे संबध आहेत. उदगीरकरांसाठी 24तास माझे घराचे दरवाजे खुले आहेत. यावेळी माजी जि.प.सदस्य बसवराज पाटिल कौळखेडकर यांनी सर्वच राजकिय पक्ष लिंगायत समाजाचा फक्त वापर करत आहे, जो पक्ष लिंगायत समाजास प्रतिनिधीत्व देईल त्यापक्षाच्या मागे राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन अॅड महेश मळगे यांनी तर आभार ओम गांजूरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती लक्ष्मिबाई पाढरे,बाबुराव पांढरे, उमाकांत चणगे, उमाकांत देशमुख,बाबुराव झुलपे,राजकुमार बिरादार, बामणीकर, अॅड विजयकुमार बिरादार, महादेव हरकरे ,प्रभुराज कप्पिकेरे, बसवराज रोडगे, किशोर पाटिल,कल्याण बिरादार चंद्रकांत पुणे,नंदू पटणे,सुशिल जिवणे,डाॅ.रवी मुळे,सोमेश्वर हुडे,सौ.कांता बुळ्ळा, चंद्रकला स्वामी कालिदास बिरादार ओम गांजूरे, डाॅ.अजय सौनटक्के,शांतविर मुळेशिवकुमार उप्परबावडे,रवी हसरगुंडे, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उदगीर शहर व परिसरातील समाजबांधव मोठ्यासंखेने उपस्थित होते.