श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे विद्यार्थिनींसाठी ” गुड टच बॅड टच” जागृती कार्यशाळा
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा आरोग्य विभाग व श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. आजूबाजूला घडणाऱ्या समाज विघातक घटना आणि त्यांचे होणारे विपरीत परिणाम दूर करणे व मुलींच्या मनातील भीती दूर करून त्यांना धाडसी बनविणे ही काळाची गरज ओळखून मुलींचा शारीरिक व मानसिक विकास घडउन आणण्यासाठी श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे “गुड टच,बॅड टच” कार्यशाळा घेण्यात आली. शाळा आणि कुटुंब ही खरी आधारस्थळे असून गुरुजन आणि आई-वडील खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सहवासात नेहमी रहा. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना केले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे महेश नवाडे व श्रीमती सुवर्णा बिरादार यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सुडे एम.पी., केंद्रे डी.पी., भोळे आर.आर.हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी याप्रसंगी करण्यात आली. नादरगे सी. बी. यांनी आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले.