महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी) : सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरूणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे. प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहे. यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. अशा निर्णयांमुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उदगीर तर्फे या सरकारला जागं करण्यासाठी तहसील कार्यालय उदगीर समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णा घोगरे, शहराध्यक्ष अजय शेटकार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुशांत बनसोडे, जळकोट तालुका उपाध्यक्ष रमन आदावळे, तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बच्चेवार, जळकोट विद्यार्थी तालुका अध्यक्ष धर्मराज पाटील, उदगीर चे विद्यार्थी शहराध्यक्ष अभिजीत अंधारे, शहर उपाध्यक्ष सागर सोनाळे, गणेश काकडे, युवकचे मुकुंद मुंडे, अमृत गायकवाड ,सुरज पांडे कृष्णा चतुरे ,मनोज हमने ,समीर शेख, किरण घोडके, शादुल शेख , ज्ञानेश्वर माटेकर, परमेश्वर कोरे, ज्ञानेश्वर ढगे, हणमंत घोगरे आदी उपस्थित होते.