मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या रामगिरी महाराज यांना पाठबळ देणाऱ्या सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा
उदगीर (एल पी उगिले) : भारत देश हा शांतीप्रिय आणि सर्वधर्मसमभाव या विचारधारेला घेऊन चालणार आहे. या देशांमध्ये सर्वांनाच समान अधिकार आहेत. असे असले तरी काही धर्मांध लोक जाती-जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये वाद लावून, आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न टायगर सेना कदापी यशस्वी होऊ देणार नाही. अशी भूमिका घेत टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जॅकी सावंत आणि राष्ट्रीय महासचिव अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्राधान्याने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या राजकीय प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा, कोणत्याही धर्मगुरू बद्दल किंवा कोणत्याही समाजाच्या श्रद्धास्थानाबद्दल कोणीही अपशब्द बोलू नये, तसेच वाचाळ वीर बनलेल्या नितेश राणे यांनाही समाज देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या दलितावरील अन्याय, अत्याचार आणि महिला वरील अन्याय, अत्याचार हे प्रकार फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जावेत. या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्व अतिक भाई शेख, वसीम भाई बिद्री, बाळासाहेब जाधव, आनंद उजळमकर, मनोज कुमार कांबळे, अभिमन्यू कांबळे, माणिक गायकवाड, शिवदास जाधव, इरफान भाई शेख, नुमान बाई सय्यद इत्यादींनी टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जाकी दादा सावंत, मोहम्मद भाई जागीरदार, हाजीभाई पठाण, अजय भैय्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आणि मोर्चा शांततेच्या मार्गाने यशस्वी करून उदगीर येथील उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले.