पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीस विषबाधा झाल्या वरून विद्यार्थी परिषद आक्रमक
लातूर (प्रतिनिधी) : विद्यार्थी परिषदेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या बाहेर अभाविप लातूरच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. काल रात्री मुलींचे वस्तीगृहातील भोजनालयातील जेवणात सरडा,निघाली. व त्या मुलींना त्याच्या माध्यमातून विषबाधा झाली.100-120 विद्यार्थिनींना दवाखान्यात रात्री हलवण्यात आले होते. या वस्तीगृहातील दुसरी घटना आहे यापूर्वीसुद्धा असाच प्रकार या वस्तीगृहात घडला होता त्यावेळी सुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदनातून अशी मागणी केली होती की तात्काळ या विषयाची गंभीरता लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतु महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या गोष्टी कडे दुर्लक्ष केले.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्यामुळे शनिवार परत एकदा असाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि शंभर पेक्षा जास्त विद्यार्थींना दवाखान्यात उपचार सुरू आहेत.त्या विद्यार्थिनीवर योग्य ती ट्रीटमेंट करण्यात यावी.
दोषी वर कार्यवाही करावी व या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. व संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करावे व त्याच्यावर कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिषद कडून करण्यात आले.यावेळी महानगर मंत्री ते सहाजुमई राऊत,महानगर सहमंत्री नरेंद्र ठाकूर, सहमंत्री वैष्णवी शितोळे, सुशांत एकोर्गे,अवि गजभारे , योगेश कांबळे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.