उदगीर ची विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाचीच – अमोल निडवदे

0
उदगीर ची विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाचीच - अमोल निडवदे

उदगीर ची विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षाचीच - अमोल निडवदे

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडली जाईल. असा विश्वास युवा नेते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल नागनाथ निडवदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार विश्वजीत गायकवाड यांच्या समर्थनार्थ उदगीर येथून शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.
सध्या महायुतीमध्ये महत्त्वाचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत दुय्यम वागणूक दिली गेली आहे. कोणत्याही शासकीय कमिटीवर महत्त्वाची पदे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दिली गेली नाही. तसेच विकास निधीची कामे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिली गेली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नंतर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायचे असल्याने आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे पूर्ण उच्चाटन करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आधार देणारे नेतृत्व उदगीर विधानसभेवर पाहिजे. असा हट्ट आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते धरू लागले आहेत. सत्तेत राहूनही भाजपचे कार्यकर्ते हे उपरेच राहिले आहेत. पक्षशिस्त म्हणून आजपर्यंत महायुतीच्या विरोधामध्ये एक शब्दही कोण्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काढला नाही. मात्र आता डोक्यावरून पाणी जाऊ लागल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई लढाई लागणार आहे. आणि त्यासाठी उदगीर विधानसभेची जागा भारतीय जनता पक्षालाच सुटली पाहिजे, असा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला आहे.
आपल्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले , माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, पंडितराव सूर्यवंशी, मनोहर भंडे, उत्तराताई कलबुर्गे, धर्मपाल नादरगे, धर्मपाल देवशेट्टे, गणेश गायकवाड, दिलीप गायकवाड, रमेश शेरीकर, आनंद बुंदे इत्यादी कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बैठक आयोजित करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन शेकडो कार्यकर्ते आपली गाऱ्हाणी मांडणार आहेत. अशी माहिती युवा नेते अमोल निडवदे यांनी दिली आहे.
पक्षाने आपल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. या दृष्टीने सर्वच नेत्यांना भेटून पक्ष हित विचारात घेऊन जागेची वाटाघाटी करावी, अशी ही आग्रहाची मागणी करणारे निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती ही देण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *