शिक्षणातून संस्कारीत पिढी निर्माण व्हावी – प्रा . संजय बिबीनवरे
उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षणातून मुलांच्या मनावर नीती मूल्यांचे संस्कार करून सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. असे मत प्रा. संजय बिबिनवरे यांनी व्यक्त केले. ते जीवन प्रयाग फाऊंडेशन,उदगीर आयोजित सौ. अनुराधा टिळे यांच्या जन्मदिनानिमित्त विठ्ठल टिळे यांच्या वतीने आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय, उदगीर येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन.पाथरे हे होते. यावेळी मंचावर मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पुढे बोलताना प्रा. संजय बिबीनवरे म्हणाले की,आज समाजामध्ये नीती मूल्यांचा होणारा ऱ्हास हा संस्कारीत पिढी निर्माण करण्यात बाधा आणत आहे, त्यामुळे शिक्षकांनी बालवयापासूनच शाळेत मुलांच्या मनावर संस्कार आणि जीवनमूल्ये बिंबविण्याचे कार्य सजगपणे करण्याची आज नितांत गरज आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. पाथरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रभात सूर्यवंशी यांनी केले. शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित लाल, संकल्प मटके अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.