गोरगरिबांना हक्काची घरे मिळावीत, योजनांचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करणार – स्वप्निल जाधव
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी गायरान जमिनीवर गोरगरीब निराधार लोकांनी गेल्या कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या वास्तव्य केलेले आहे मात्र दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी त्यांना अधांतरी ठेवून शासकीय योजना पासून दूर ठेवले आहे त्या सर्व उपेक्षित घटकांना सोबत घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे विचार युवा नेते तथा उदगीर विधानसभा मतदार संघाची इच्छुक उमेदवार स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून उदगीर शहरातील अनेक भागात राहणाऱ्या लोकांना मध्यंतरी महसूल विभागाच्या वतीने गायरान जमिनी खाली कराव्यात आणि कब्जे काढावेत अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या होत्या ज्या अत्यंत चुकीच्या आणि निराधार होत्या मात्र जनतेने शासनाच्या त्या नोटिशीला झुगारून लावून आपण ज्या ठिकाणी राहतो आपल्या पिढ्यान पिढ्या तिथे राहत आहेत तिथे कायम वास्तव्य केलेले आहे तिथेच राहणे पसंत केले असाच विषय तोंडार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तोंडार पाटी येथील गायरान जमिनीवर जवळपास 40 वर्षापासून अनेक गोरगरीब मोलमजुरी जीवन जगणारे राहतात त्यांनी तिथे घरीही उभा केली आहेत मात्र त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही कारण त्या गायरान जमिनीवर त्यांचा कब्जा असला तरीही शासनाच्या वतीने त्यांना कबाली दिले नाही, त्यामुळे शासनाच्या घरकुल योजने पासून हे लोक वंचित आहेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून स्वप्निल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकांनी मोर्चा काढून विहीर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाहिजे शासनाने सर्वांसाठी घरी ही योजना जाहीर केली आहे त्या योजनेपासून हे बेघर असलेले लोक का वंचित असा प्रश्नही स्वप्निल जाधव यांनी उपस्थित केला आहे तसेच त्यांना ते जिथे राहत आहे तिथे नियमित करून त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कबाले द्यावेत तसेच त्यांना ग्रामपंचायतीने नमुना नंबर आठ अ दिला जावा अशी ही आग्रही मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे अशाच पद्धतीची परिस्थिती उदगीर शहरातील अनेक प्रभागात आहे त्या सर्वच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचेही स्वप्निल जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.