तलवार घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे देऊळवाडी सारख्या छोट्याशा गावात 32 इंच लांबीची धारदार पाते असलेली लोखंडी तलवार घेऊन समाज मनावर आपली छाप टाकत, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बबन भगवान गडीकर (वय 38 वर्ष राहणार देऊळवाडी तालुका उदगीर) हा लोकांमध्ये आपली दहशत निर्माण व्हावी. या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररित्या लोखंडी तलवार स्वतःच्या कब्जात बाळगून फिरत असल्याची माहिती वाढवणा पोलिसांना समजताच वाढवणा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल इकराम उजेडे, जोशी, कलकत्ते यांनी घटनास्थळावर जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी यांनी घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश दिलेला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन करत असताना आरोपी आढळून आला. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल इकराम उजेडे हे अधिक तपास करत आहेत.