छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथील रहदारीस अडथळा होत असलेली होर्डिंग कमान तात्काळ हटवा – प्रेम तोगरे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक अत्यंत रहदारीचा व वर्दळीचा चौक आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील १० ते १२ दिवसांपासुन एक कमान चौकातील वाहनाच्या रहदारीस अडथळा निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जन सन्मान यात्रा कार्यक्रम दि.३०/०९/२०२४ रोजी होऊन सुद्धा शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग, कमानी अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा अत्यंत गर्दीचा व वर्दळीचा चौक आहे. शिवाय सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.याबद्यल लोकामध्ये प्रचंड नाराजीचा सुर आहे. नगर परिषद कार्यालयाकडून अतिक्रमण म्हणून गोरगरीबांचे डब्बे, गाडे हटविले जातात मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे होर्डिंग्ज,कमानी १५ दिवस उलटुनही हटविले जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज चौकतील रहदारीस अडथळा होणारी कमान तत्काळ हटवावी, अन्यथा ही कमान का हटवली जात नाही याचे कारण तरी सांगण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रेम तोगरे व अभिनव गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.