डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
उदगीर (प्रतिनिधी) : येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात, उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रमाकांतराव बनशेळकीकर, संस्था सचिव देविदासराव नादरगे, डॉ. उमेश वर्मा, प्रशांत गायकवाड, पल्लवी चिलकलवार, गौरी जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पुस्तक व पुष्प देऊन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. उमेश वर्मा यांनी डोळ्यांच्या आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी व टाळावयाच्या गोष्टी याबाबतचे मार्गदर्शन केले, तर रमाकांतराव बनशेळकीकर यांनी मोबाईलचा आपल्या डोळ्यावर होणारा दुष्परिणाम याबाबतची माहिती दिली.
या शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तज्ञ डॉक्टर्सकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित बिराजदार यांनी तर आभार प्रशांत पांचाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुलता बोडके, वर्षा पाटील, सुनिता शिंदे ,आम्रपाली सोमवंशी, मनोरमा तेलंगे, वर्षा बिरादार, शशिकुमार पाटील, विठ्ठल नादरगे, गोविंद रावळे यांनी परिश्रम घेतले.